24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयलालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच

लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मात्र दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असल्याने तूर्तास त्यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही.

चाईबासा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांनी त्यांची अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. या प्रकरणातील अर्धी शिक्षा पूर्ण झाल्यानेच लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या सुनावणीत सीबीआयने अद्याप अर्धी शिक्षा बाकी होण्यासाठी २६ दिवस व्हायचे आहेत असे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी आजपर्यंत म्हणजेच ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

यादव यांना ५० हजारांच्या दोन जातमुचलक्यांवर आणि २ लाख रुपये दंड या अटींवर जामिन मंजूर झाला. चारा घोटाळ्यातील दुमका प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर झालेला नाही. नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणातीलही अर्धी शिक्षा लालूप्रसाद यादव पूर्ण करतील. त्यानंतर जर लालूप्रसाद यादव यांनी याही प्रकरणी जामीन अर्ज दाखल केला तर तो मंजूर होण्याची शक्यता आहे. जर जामीन मिळाला तर नोव्हेंबर महिन्यात ते तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.
सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांना मिळालेला जामीन राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांचा हुरुप वाढविणारा ठरणार आहे.

रुद्रम-१ ची चाचणी यशस्वी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या