16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयलालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

एकमत ऑनलाईन

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून स्थिर होती. मात्र, आज ७ नोव्हेंबर रोजी अचानक प्रकृती पुन्हा खालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डायबिटीजमुळे क्रिएटिनिन लेव्हल वाढली आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिली आहे. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अशीच खालावत गेली तर काही दिवसांनी डायलिसीस करावी लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लालू यांच्या प्रकृतीबाबतचा रिपोर्ट हायकोर्टाने मागितली होता. त्यानंतर रिम्स रुग्णालयाने आज लालू यांच्या प्रकृतीचा रिपोर्ट हायकोर्टाला दिला.

७५ टक्के किडनी निकामी
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांची फक्त २५ टक्के किडनी काम करत आहे. जवळपास ७५ टक्के किडनी निकामी झाली आहे. लालू यांची प्रकृती आणखी बिघडली तर डायलिसिस करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लालू यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यादिवशी त्यांची किडनी ३ बी स्टेजवर होती. मात्र, आता ती स्टेज ४ वर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षात इन्सुलिन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे किडनीने चांगलं काम केलं. मात्र, आता पुन्हा त्यांची किडनी निकामी होत चालली आहे. त्यामुळे डॉक्टरांनाचिंता वाढली आहे. कोरोना संसर्गाचा धोका नसता तर लालू यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केलं असतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मानसिक तणावामुळे प्रकृती बिघडली
डॉक्टरांच्या मते, मानसिक तणाव वाढल्यामुळे लालू प्रसाद यादव यांची प्रकृती जास्त बिघडली. मानसिक तणाव हेच प्रमुख कारण असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. लालू यादव सतत निवडणुकीबाबत विचार करत असतात. निवडणुकीच्या विचारांमुळे ते खाण्या-पिण्याकडेही लक्ष देत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

बिहारमध्ये सत्तांतराची चाहूल?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या