रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना जामीनासाठी आणखी काही काळ बघावी लागणार आहे. चारा घोटाळ्यातील दुमका कोषागारप्रकरणी लालूप्रसाद यादव यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. झारखंड उच्च न्यायालयात याप्रकरणी ११ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. याआधीही जामीनावरील त्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
चारा घोटाळ्यातील दुमका कोषागारप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. लालूप्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला असून, त्यांना जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता. याआधी चाईबासा प्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. चार घोटाळ्यातील चार प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी तुरुंगाबाहेर येण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.
मात्र, त्यावेळीही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने त्यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. आता या प्रकरणी ११ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे