श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आता रामबनमधील लोक भूस्खलनामुळे घाबरले आहेत. जिल्ह्यातील दुक्सर दलवा गावात भूस्खलनामुळे एक डझनहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या १३ कुटुंबाुंतील लोकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. हे गाव रामबन जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर आहे.
तेथे १ किमी परिसरात भूस्खलन झाले आहे. यामुळे कबरींचेही नुकसान झाले. यामुळे लोकांनी अनेक कबरीतून मृतदेह काढून अन्यत्र दफन केले आहेत. रामबन भूस्खलन प्रभावित क्षेत्र आहे. हा जिल्हा महत्त्वाचा आहे. कारण, श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग याच डोंगराळ जिल्ह्यातून जातो. येथील डोंगर पोखरून काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती होत आहे.