21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये लॅपटॉप प्रोटेस्ट

केरळमध्ये लॅपटॉप प्रोटेस्ट

एकमत ऑनलाईन

तिरुवनंतपुरम : मुला-मुलींना एकत्र बसण्यास केली मनाई, एकमेकांच्या मांडीवर बसून केला. केरळमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला त्यांनी ‘लॅपटॉप प्रोटेस्ट’ असे नाव दिले. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल हे ‘लॅपटॉप प्रोटेस्ट’ म्हणजे नेमके काय? आणि विद्यार्थी हा प्रोटेस्ट का करताहेत? चला तर जाणून घेऊया.

तिरुवनंतपुरम रेल्वे स्टेशनच्या उत्तरेस १३ किमी अंतरावर स्थित केरळमधील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ओळखल्या जाणा-या त्रिवेंद्रम अभियांत्रिकी महाविद्यालयीन कॅम्पस, २५० एकर जागेवर पसरलेला आहे. हा देशातील सर्वात मोठ्या कॅम्पसपैकी एक आहे. या कॅम्पसच्या बाहेर बसस्टॉप आहे जे बहुतेक विद्यार्थ्यांचे आवडते ठिकाण आहे. जिथे मुले आणि मुली शेडमधील एका लांब स्टीलच्या बाकावर एकमेकांशी बोलत बसतात. मात्र मुला मुलींचे एकत्र बसण्यास तिथे सातत्याने विरोध केला जातो.

एकेदिवशी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या समोर एक विचित्र घटना घडली. मुले आणि मुली एकत्र बसू नयेत म्हणून तीन सीटचे असलेले लांब बेंच प्रत्येकी एका सीटमध्ये कापून टाकण्यात आले होते. जिथे 5 ते 6 लोक एकत्र बसू शकत होते तिथे आता फक्त तीन लोक बसायला जागा होती. या ‘मॉरल पोलिसिंग’ ला कंटाळून आता विद्यार्थ्यांनी ‘लॅपटॉप प्रोटेस्ट सुरू केला आहे. या महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपलाही हे आवडले नाही आणि त्यांनी ‘मॉरल पोलिंिसग’ विरोधात आपला आक्षेप नोंदवत एक नवीन मार्ग शोधला. या मुला-मुलींचा एक ग्रुप एकमेकांच्या मांडीवर बसला आणि फोटो क्लिक केले आणि त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शेअर केले. काही वेळातच हे फोटो प्रचंड व्हायरल झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या