32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयदेशातील बँकिंग फसवणुकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ

देशातील बँकिंग फसवणुकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच फसवणूकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. देशातील बँकिंग फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच एक मोठे कारण म्हणजे यादरम्यान इंटरनेटचा वाढता वापर. याचाच फायदा सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी करुन घेत आहेत. गृहमंत्रालयानेच आता याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या सायबर दोस्त या ट्वीटर अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावाने केल्या जाणा-या फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे.

मंत्रालयाने लोकांना इशारा दिला आहे, की कोणत्याही प्रकारची चूक करू नका. तसेच तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची प्रकरणे समोर येत आहेत. याच कारणामुळे सरकार आणि बँकांनी लोकांना याबद्दल जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तरीही हे गुन्हे बंद झालेले नाहीत. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करत आहे. नवनवीन मार्गांनी लोकांना आपल्या जाण्यात ओढत आहेत. लिंकवर क्लिक केल्यास हॅकर तुमची संपूर्ण माहिती चोरू शकतात. त्यामुळे अशा लिंकवर कधीच क्लिक करू नका.

कोणत्याही लिंकवर क्लिक टाळा
लोक काहीही विचार न करता या लिंकवर क्लिक करतात आणि त्यांची संपूर्ण माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. गृहमंत्रालयाद्वारे सायबर दोस्त या हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये या मेसेजचे स्वरुपही दाखवले गेले आहे. तुम्हाला असा मेसेज येत असेल तर लगेचच सायबर क्राईम पोलिसांकडे याबद्दलची तक्रार करा.

फेक मॅसेज तपासा
सोबतच मेसेजमध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. सरकारकडून वेळोवेळी फेक मेसजबद्दलचा अलर्ट जारी केला जातो. तसेच या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कधीच अनोळखी नंबरवरुन आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि हे मेसेज फॉरवर्डही करू नका.

हॅकिंगच्या घटनेतही वाढ
व्हॉट्सऍपसंबंधित नवनवीन माहिती ही समोर येत आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सऍप युजर्सला अलर्ट केले आहे. व्हॉट्सऍप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचे व्हॉट्सऍप अकाऊंट हॅक होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. हॅकर्सनी व्हॉट्सऍप अकाऊंटचा ऍक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं व्हॉट्सऍप रन करू शकतात. व्हॉट्सऍप युजर्स हकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुस-या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकते.

पत्रकार खाशोगी यांची हत्या राजकुमार सलमान बिन मोहम्मद यांच्या परवानगीनेच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या