24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयकोरोना लशीचे भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादनाची शक्यता

कोरोना लशीचे भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादनाची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : खासगी उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून भारतात कोरोना लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता बिल आणि मिलिंडा फाऊंडेशनचे सीईओ मार्क सुझमन यांनी व्यक्त केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कोरोनाविरोधातील लढाई भारताकडून योग्य पद्धतीने चालू
हातात असलेल्या सर्व साधनांनिशी भारत कोरोनाविरोधातील लढाई योग्य पद्धतीने हाताळत आहे, असेही सुझमन यांनी सांगितले. पुढील वर्षापर्यंत कोरोनावरील काही लसी येणे अपेक्षित असून त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात भारतातच होईल, हा कोरोना लढाईतील पुढचा महत्त्वपूर्ण टप्पा असेल, असे ते म्हणाले. लस तयार झाल्यानंतर तिचे जगभर योग्य वितरण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विकसनशील देशांनाही सधन देशांइतका वाटा एकाच वेळी आणि सारख्याच प्रमाणात मिळू शकेल. जागतिक पातळींवरील काही निर्देश आणि राष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक सूचनांनुसार हे वितरण होईल, असे ते म्हणाले.

बिल आणि मिलिंडा फाऊंडेशन कोरोनाशी विविध पातळ्यांवर लढत आहे. आम्ही संशोधनात सहभाग देत असून सेपी या संस्थेसोबत कार्यरत आहोत. त्यांच्यासोबत आम्ही कोरोनावरील काही औषधांचे उत्पादन करत आहोत, असे ते म्हणाले. कोरोना लशींवरील संशोधनातही आमचा सहभाग असून कोव्हॅक्स ही लस विकसित करण्यात आमचा सहभाग आहे. सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि ‘गॅव्ही’सोबत आम्ही थेट गुंतवणूक केली असून लस विकसित करण्याचे काम अत्यंत वेगाने काम सुरू आहे. नियंत्रण संस्थेची मान्यता मिळण्यापूर्वीच काही उत्पादने तयार आहेत. आम्ही यासाठी घाई करत आहोत कारण आम्हाला विकसनशील देशांतील गरजू लोकांपर्यंत वेळेत लस पोहोचवायच

मुंबई बत्ती गुलप्रकरणी ७ दिवसांत अहवाल सादर करा – ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या