18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयदहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दहा लाख कोटी रुपयांच्या गतीशक्ती योजनेचा शुभारंभ केला. या योजनेद्वारे रखडलेल्या प्रकल्पाची मोट बांधण्यासाठी १६ मंत्रालयाची मोट बांधणार आहेत. केंद्रीय वाणीज्य, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, रेल्वे, नागरी हवाई वाहतूक, नौवहन, उर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या खात्याचे मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. २०२५ पर्यंत उभारल्या जाणा-या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या आधारावर आपण पुढील २५ वर्षाच्या भारताचा पाया रचणार आहोत. पीएम गतीशक्ती योजना हा मास्टरप्लॅन उद्याच्या भारताचे भविष्य आहे. हा मास्टरप्लॅन २१ शतकातील भारताला गतीशक्ती देईल. या अभियानाच्या केंद्रस्थानी भारताचे लोक, भारतातील शेतकरी, इंडस्ट्री, व्यापार आणि मॅन्युफॅक्चरर्स असतील. गतीशक्ती योजनेमुळे नव्या भारताच्या निर्मितीला ऊर्जा मिळेल. रस्त्यातील काही अडथळेही दूर होतील. निर्धारित वेळेत एखादा प्रक्लप पूर्ण करण्याची कार्यसंस्कृती विकसीत केली आहे. सध्याच्या घडीला तर वेळेच्या आधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या