चंदिगढ : उत्तर प्रदेशनंतर आता हरियाणामध्ये देखील लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा निर्माण करण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
वल्लभगड येथील निकिता तोमर हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल विज यांनी ट्विट करत, हरियाणामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यावर विचार सुरू आहे, असे सांगितले.
आरोपींना लवकरच शिक्षा
फरीदाबाद हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने अगोदरच घेतलेला आहे. आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेशमधील वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची अत्यंत गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसून आले. लवकरच लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी भर सभेत सांगितले होते.
५९० चा गॅस सिलेंडर ६२० रूपयांना