22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीययूपीत न्यायालयातच वकिलाची गोळ्या घालून हत्या

यूपीत न्यायालयातच वकिलाची गोळ्या घालून हत्या

एकमत ऑनलाईन

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात एका वकिलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृत वकिलाचे नाव भूपेंद्र सिंह असल्याचे समोर येत आहे. न्यायालयाच्या तिस-या मजल्यावर वकिलाचा मृतदेह सापडला असून त्या मृतदेहाजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल देखील आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

प्राथमिक अहवालानुसार, संबंधित वकील एका व्यक्तीशी बोलत होता. त्यानंतर अचानक मोठा आवाज झाला आणि तो जमिनीवर कोसळला. न्यायालयातील त्याच्या सहकारी वकिलांपैकी एकाने सांगितले, आम्हाला याबद्दल सविस्तर माहिती नाही. ही घटना घडण्यापूर्वी आम्ही न्यायालयात होतो. कोणीतरी येऊन आम्हाला सांगितले, की एका व्यक्तीला गोळी लागली आणि त्यात तो मरण पावला. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा त्या मृतदेहाजवळ आम्हाला देशी बनावटीचे पिस्तूल देखील आढळून आले. हा सहकारी आधी बँकेत काम करत होता आणि गेली ४-५ वर्षे वकील म्हणून सराव करत होता, असे त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या