27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयराहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जी?

राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जी?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा काँग्रेसने आरोप केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना तसे पत्र देण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्राव्दारे केंद्रीय गृहमंत्र्यांना काँग्रेसकडून तक्रार करण्यात आला आहे. यानंतर जितके सेलिब्रेटी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले त्यांची आयबी कडून चौकशी होत असल्याचाही दावाही करण्यात येतोय. तसेच यापुढे पंजाब आणि जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील भागातून ही यात्रा जात असल्याने खबरदारी घेण्यासंदर्भात विनंती या पत्राव्दारे करण्यात आली आहे.

सुरक्षा मजबूत करण्याचे आवाहन
भारत जोडो यात्रेत कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत कॉंग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहण्यात आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जी होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.

वेणुगोपाल यांचे गृहमंत्र्यांना पत्र
काँग्रेसचे पवन खेडा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की राहुल गांधींना तुम्ही सहज ओळखू शकता, तर वेणुगोपाल यांनी त्यांच्या सुरक्षेसंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे खेडा यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता आम्ही संवेदनशील भाग असलेल्या पंजाब आणि काश्मीरमध्ये जाणार आहोत. भारत जोडो यात्रा हे यज्ञ, तपश्चर्या आहे. त्यात काही समाजकंटक अडथळा आणत आहेत.

भारत जोडोमुळे भाजप अस्वस्थ : खरगे
तर काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले की, भारताच्या मूलभूत तत्त्वांवर सतत हल्ला होत आहे. संपूर्ण देशात द्वेषाची दरी खणली जात आहे. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण आहे. पण सरकारला त्याची पर्वा नाही. खरगे म्हणाले की, काँग्रेसला सर्वसमावेशक बनवायचे असेल तर युवक, महिला, विचारवंत यांचा समावेश करावा लागेल आणि त्याची सुरुवात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने झाली आहे. त्याने आमच्या प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या