24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयहरियाणाचा नेता राष्ट्रवादीत

हरियाणाचा नेता राष्ट्रवादीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकता शक्ती पक्षाच्या नेत्यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. हरियाणातील एकता शक्ती पक्षाचे अध्यक्ष वीरेंद्र वर्मा यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. याचा मला आनंद आहे, असे पवारांनी म्हटले.

वीरेंद्र वर्मा हे हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील आहेत. करनाल हा असा जिल्हा आहे, ज्यामध्ये खाद्यसंकट संपवण्याची क्षमता आहे. शेतक-यांच्या पिकांना योग्य मूल्य अद्यापही मिळालेलं नाही. वीरेंद्र वर्मा यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शेतक-यांच्या हितांचे रक्षण करेल, असे शरद पवार म्हणाले. आम्हाला हरियाणा येथे एनसीपी पक्षाची बांधणी मजबूद करू इच्छिते, हरियाणा येथील शेतक-यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही पवार म्हणाले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या