23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयसरकारी ऍटिट्यूड बाजूला ठेवा अन्यथा पॅकअप

सरकारी ऍटिट्यूड बाजूला ठेवा अन्यथा पॅकअप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल १.६४ लाख कोटींचे पॅकेज दिले आहे. हे पॅकेज सरकारने सहजासहजी दिलेले नाही, कंपनीच्या कर्मचा-यांनी यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे असे केंद्राचे म्हणणे आहे.

त्यामुळेच जर सरकारी बाबूंप्रमाणे काम करायचे असेल तर सरळ घरचा रस्ता धरावा असा थेट इशाराच केंद्रीय टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या कर्मचा-यांना दिला आहे.
याबाबतचा मोबाईल संदेश सर्व कर्मचा-यांना सरकारकडून पाठविण्यात आला आहे. या मेसेजमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की कर्मचा-यांनी आता सरकारी अ‍ॅटिट्यूड सोडावा आणि अपेक्षित कामगिरी करुन दाखवावी अन्यथा अशा कर्मचा-यांना सक्तीने घरी पाठवले जाईल.

वैष्णव यांनी बीएसएनएलच्या ६२,००० कर्मचा-यांना हा इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या बीएनएनएलच्या वरिष्ठ व्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत वैष्णव यांनी याचे संकेत दिले होते. आपण जर कंपनीला वाचवण्यासाठी १.६४ लाख कोटी दिले अहेत तर तसे कामही होणे अपेक्षित आहे. जर ते जमत नसेल तर तुम्ही पॅकअप करा, असा थेट इशारा देताना याविषयी तुमच्या मनात शंका असता कामा नये असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या