23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeराष्ट्रीयडावे-काँग्रेस-भाजप ममतांना घेरणार

डावे-काँग्रेस-भाजप ममतांना घेरणार

एकमत ऑनलाईन

कोलकाता : आरएसएसने आम्हाला एक टक्काही पाठिंबा दिला तर आम्ही लाल दहशतवादाशी लढू शकू. ममता बॅनर्जी यांनी २००३ साली असे सांगितले होते. तेव्हा त्या पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षात होत्या आणि बंगालमध्ये डाव्यांसोबत लढत होत्या. ममता त्यावेळी एनडीएचा भाग होत्या. हीच वेळ होती जेव्हा आरएसएस नेते तरुण विजय यांनी ममता बॅनर्जी यांना भाषण देण्यासाठी मंचावर बोलावून त्यांना बंगालची दुर्गा असे संबोधले.

सन २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी सीपीएमची ३४ वर्षांची सत्ता संपवली. तेव्हापासून बंगालमध्ये त्यांची सत्ता आहे. २० वर्षांपूर्वी लाल दहशत संपवण्यासाठी ज्या आरएसएसची मदत घेतली होती, त्याच आरएसएस आणि भाजपला आता सीपीएमचे लोक ममता बॅनर्जींना बंगालमधून हटवण्यासाठी मदत करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये पंचायत निवडणुका होऊ शकतात. याचे प्रकरण अद्याप न्यायालयात आहे, त्यामुळे तारीख निश्चित झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरच निवडणुका कधी होणार, याचा निर्णय होणार आहे. टीएमसीपासून भाजप आणि सीपीएमने मैदानावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कारण पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीवर पंचायत निवडणुकांचा मोठा परिणाम होणार आहे.

स्थानिक पातळीवर युती
सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर डाव्यांनी भाजपसोबत युती करून टीएमसीचा पराभव करण्याची तयारी केली आहे. ममता यांचा पराभव करण्यासाठी भाजपही डाव्यांचा आधार घेण्यास मागेपुढे पाहत नाही. केवळ कम्युनिस्टच नाही तर काँग्रेसही अनेक ठिकाणी भाजपसोबत आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या