27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयभारतात सलग पाचव्या दिवशी ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण

भारतात सलग पाचव्या दिवशी ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात सलग पाचव्या दिवशी नवीन रुग्णाची संख्या ५० हजारांच्या आत राहिली आहे. २४ तासांत ४७,९०५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याची दैनंदिन संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त असण्याचा कल ४० व्या दिवशीही कायम आहे. २४ तासांत ५२,७१८ रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४.९८ लाख आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी केवळ ५.६३ टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ही संख्या ५ लाखांपेक्षा कमी म्हणजेच ४,८९,२९४ इतकी आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असल्याने रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला आहे.

सध्या हा दर ९२.८९ टक्के इतका आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८०,६६,५०१ वर गेली आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यातील अंतर झपाट्याने वाढत असून ७५,७७,२०७ झाले आहेत़

जिल्हा रोगमुक्त… हेच कंठेवाड बंधूंचे अंतिम ध्येय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या