22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयदेशात एक हजारांहून कमी कोरोनाबाधित

देशात एक हजारांहून कमी कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगासह भारतातही कोरोनाचा धोका कायम आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. देशातही कोरोना विषाणूसोबत इतर विषाणूजन्य आजारांनी आरोग्य व्यवस्थेला चिंतेत टाकलं आहे. मुंबईसह देशात गोवर आणि डेंग्यू आजाराचा धोका वाढला आहे. त्यातच एक दिलासादायक बातमी म्हणजे देशात आज कोरोनाबाधितांची संख्या किंचित घटली आहे.

देशात गेल्या २४ तासांत एक हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात ८३३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेने आज नऊ रुग्णांची घट झाली आहे. काल देशात गेल्या २४ तासांत ८४२ कोरोनाबाधित सापडले आहेत आणि सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या