26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयतुमच्या फोनची आम्हाला माहिती

तुमच्या फोनची आम्हाला माहिती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इस्रायली सॉफ्टवेयर पेगाससद्वारे केलेल्या गुप्तहेरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे, अशा आशयाचे ट्विट करुन राहुल यांनी सरकारला टोला लगावला. रविवारी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला आहे.

पॅरिसमधील संघटना फॉरबिडेन स्टोरीज आणि एमनेस्टी इंटरनॅशनलसह अनेक संघटनांनी तपास केला आहे. यात इस्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर पेगाससचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच, ही फोन हॅकिंग केंद्र सरकारच्या सांण्यावरुन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या मुद्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक विरोधी नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्विट करत केंद्र सरकारला टोला लगावला. तुम्ही तुमच्या फोनमध्ये काय वाचतात, हे आम्हाला माहित आहे, असे ट्विट राहुल यांनी केले.

काय आहे पेगासस हॅकिंग वाद ?
रविवारी रात्री एक रिपोर्ट समोर आली. यात दावा करण्यात येतोय की, इस्रायलमधील पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतातील ३०० पेक्षा जास्त लोकांचा फोन हॅक करण्यात आला. यात पत्रकार, मंत्री, नेते, उद्योजक आणि इतर लोकांचा समावेश आहे. ही रिपोर्ट वॉशिंग्टन पोस्टसह १६ माध्यम कंपन्यांनी पब्लिश केली आहे. रिपोर्टच्या पहिल्या टप्प्यात ४० पत्रकारांचा समावेश आहे. दावा करण्यात येतोय की, २०१८-२०१९ दरम्यान या पत्रकारांचे फोन हॅक करण्यात आले. यादरम्यान वॉट्सअ‍ॅप कॉल, फोन कॉल, रेकॉर्डिंग, लोकेशन इत्यादी महत्वाची माहिती घेण्यात आली. खुलासा करणाºया कंपन्यांनी सांगितले की, ही रिपोर्ट अनेक टप्प्यात जाहीर केल्या जाणार आहे. येणाºया टप्प्यात नेते, मंत्री आणि इतर व्यक्तींची नावे असू शकतात.

केंद्राचे स्पष्टीकरण
रविवारी रात्री साडे नऊ वाजता ही रिपोर्ट समोर आली. यानंतर लगेच केंद्र सरकारने या रिपोर्टवर स्पष्टीकरण दिले. केंद्र सरकारने फोन हॅकिंग आणि यासंबंधी आरोपांचे खंडन केले आहे. तसेच, या रिपोर्टला भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. आपला बचाव करताना सरकारने म्हटले की, भारताच्या लोकशाङीत प्रायवसी एक अधिकार आहे. ही रिपोर्ट पूर्णपणे खोटी आहे.

मुंबईत मृत्यूचे तांडव; पावसाने दाणादाण, दरड, संरक्षक भिंत, इमारत कोसळली, ३० मृत्युमुखी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या