28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयमुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील ताज हॉटलेलला पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञातांनी रात्री उशिरा हॉटेलमध्ये फोन करुन मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, अशी धमकी दिली.

हॉटेल ताज उडवण्यात येणार असल्याची धमकी आज पहाटे रिसेप्शन काउंटर असलेल्या टेलिफोन वर आली होती. हॉटेल ताज प्रशासनकडून याबाबत मुंबई पोलिसांना या धमकीबाबत कळवण्यात आले असून अद्याप कुलाबा पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची पोलीस सूत्रांनी दिली. ताज परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली असून त्या परिसरात येणारी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, तसेच ताजमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. हॉटेल ताजच्या रिसेप्शन काउंटरला आलेल्या धमकीच्या कॉलमध्ये पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ताज हॉटेलमध्ये धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने आपलं स्वत:चं नाव ‘सुलतान’ असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय आपण पाकिस्तानातून बोलतोय असंही तो म्हणाला. त्याने ताज हॉटेलमध्ये पुन्हा 26/11 सारखा हल्ला करु, अशी धमकी दिली.

कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला अतिरेकी हल्ला सगळ्यांनी बघितला. आता ताज हॉटेलमध्येही 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार, असंदेखील तो फोनवर म्हणाल्याची माहिती आहे. या पूर्वी २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. दहा दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत प्रवेश करत बेछुट गोळीबार करण्यात सुरूवात केली होती. ताज हॉटेलमध्ये दोन दहशतवाद्यांनी घुरखोरी करत तेथील सर्वांना वेठीस धरले होते. कित्येक तास त्या दहशतवाद्यांशी मुंबई पोलीस आणि जवान झुंज देत होते. त्यामुळे पुन्हा एकदा ताजवर हल्ल्याची धमकी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Read More  कोरोनाचा फटका : PPE कीटसाठी आकारले 27 हजार रुपये बिल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या