नवी दिल्ली : सीएनजीचे दर महाग झाल्याने अनेक वाहनधारकांचे आर्थिक बजेट बिघडले आहेत. मात्र, सीएनजीधारक वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत सीएनजीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. गॅसचे वितरण करणा-या कंपनीच्या खर्चात घट झाली आहे.
त्यामुळे सीएनजीच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या किमतीत वाढ झाली होती. गेल्या २ महिन्यात १२ वेळा सीएनजीच्या दर वाढले आहे. दिल्लीत ७३.६१ रुपये प्रति किलोग्रॅम सीएनजी आहे, तर गेल्या एका वर्षात सीएनजीत ३०.२१ रुपये प्रति किलोग्रॅम म्हणजेच ६० टक्के वाढ झाली आहे.