नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड देशातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट, ओळखपत्र आहे. त्याशिवाय इनकम टॅक्स रिटर्न करतानाही पॅन कार्डसह आधार नंबर देणे आवश्यक असते़ सरकारने यापूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा अवधी ३० जून २०२० वरून वाढवून ३१ मार्च २०२१ केला आहे.
त्यामुळे दिलेल्या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास, त्यांना दंड भरावा लागेल आणि १ एप्रिल २०२१ पासून त्यांचे पॅन कार्ड इनअॅक्टिव्ह होईल. इनकम टॅक्स डिपार्टमेंटनुसार, पॅन निर्धारित अवधीत आधारशी लिंक न केल्यास, ते इनअॅक्टिव्ह होईल. डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, पॅन कार्ड धारकांना विना पॅन कार्डधारक मानले जाईल, त्याशिवाय आयकर कायद्याच्या कलम २७२ बी अंतर्गत १० हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.
पुण्यातील शाळा-महाविद्यालये १४ मार्चनंतरही बंद