27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयआंबा, लिचीपासून बनवणार दारू

आंबा, लिचीपासून बनवणार दारू

एकमत ऑनलाईन

लखनौ : तुम्ही आतापर्यंत द्राक्षापासून वाईन बनवल्याचे ऐकले असेल. तुम्ही वाईनचे शौकीन असाल तर आंबा, लिची आणि बेरीपासून बनवलेली वाईनही आता प्यायला मिळेल. उत्तर प्रदेश सरकार आता आंब्यापासूनही दारू बनवण्याच्या तयारीत आहे.

उत्तरप्रदेशात आंबा, लिची आणि जांभळापासून दारू निर्मितीच्यादृष्टीने दारू कंपन्यांशी चर्चा केली जात आहे. आंबा, लिची आणि जांभळापासून वाइन बनवल्यास फळांची लागवड करणा-या शेतक-यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. उत्तर प्रदेश उत्पादन शुल्क विभाग ९ जुलै रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. ज्यामध्ये मद्य उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी देखील सहभागी होतील. याचा मुख्य अजेंडा असा असेल की, आंबा उत्पादक शेतक-यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा, असे उत्तर प्रदेशतील फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होते. दोन्ही ठिकाणी आंबा व लिचीचे बंपर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशच्या आंब्याची राज्यभर ओळख आहे. उत्तर प्रदेशात विविध प्रकारचे आंबे पिकवले जातात. ज्यांना देश-विदेशात चांगलीच मागणी आहे. फळ उत्पादक शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. फळांपासून दारू बनवण्याचा मार्ग सापडला तर शेतक-यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या