23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयअत्यावश्यक औषधांची यादी जाहीर

अत्यावश्यक औषधांची यादी जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : तब्बल सहा वर्षांनंतर अत्यावश्यक औषधांची नवी यादी जारी करण्यात आली आहे. या औषधांवर किंमतीची मर्यादा लागू असल्याने ते सर्वसामान्यांच्या खिशावर परडवणारे असणार आहेत. वास्तविक, २०१५ नंतर तब्बल सहा वर्षांनी एनईएलएममध्ये ही यादी जारी करण्यात आली आहे.

सन २०१५ नंतर २०२२ मध्ये अपडेट करून एनईएलएम तुमच्या समोर असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. तसेच औषधांच्या यादीसाठी लांबलचक प्रक्रिया आहे. त्यानंतर काही औषधांचा यामध्ये समावेश करण्यात येतो. यासाठी एक स्वतंत्र समिती निर्णय घेते. तसेच ३५० तज्ज्ञांशी आणि १४० वेळा सल्लामसलत केल्यानंतर ही यादी तयार करण्यात आल्याचेही मांडविया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या यादीमधील औषधे सुरक्षित, परवडणारी आणि उपलब्ध होणारी आहेत. एनपीपीए औषधांची विक्री किंमत ठरवेल. त्यामुळे औषधांची अवास्तव किंमत वाढवता येणार नाही.

मान्यताप्राप्त औषधांचाच समावेश
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की ही यादी अत्यंत महत्त्वाची आहे. प्राथमिक, सेकंडरी आणि तृतीय पातळीवर उपचारासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, जी औषधे आपल्याकडे मान्यता प्राप्त आणि लासन्सप्राप्त आहेत, त्याच औषधांनी या यादीत सामील करण्यात आलं आहे. यादीत ३८४ औषधे असून ३४ औषधे नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या