26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयलिव्ह-इन रिलेशनशीप वापरा आणि फेकून द्या संस्कृतीला प्रोत्साहन

लिव्ह-इन रिलेशनशीप वापरा आणि फेकून द्या संस्कृतीला प्रोत्साहन

एकमत ऑनलाईन

कोच्ची : एका सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘वापरा आणि फेकून द्या’ या धोरणाला प्रोत्साहन देणाऱ्या ग्राहक संस्कृतीचा लोकांच्या सामाजिक जीवनावर परिणाम झाला आहे. न्यायमूर्ती मोहम्मद मुश्ताक आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने अलाप्पुझा येथील मूळ रहिवाशांनी दाखल केलेली घटस्फोट याचिका फेटाळून लावत, हे निरीक्षण नोंदवले आहे.

कोर्टाने नमूद केले की, लिव्ह-इन रिलेशनशिप, जे गरजा पूर्ण झाल्यावर सहज संपुष्टात येऊ शकते, वाढत चालले आहे. केरळ हे नातेसंबंधांना महत्त्व देणारे राज्य आहे. त्याचबरोबर, आता लोकांना असे समजत आहेत की, विवाह हा जीवनाचा आनंद घेण्यासाठी अडथळा आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

आजकालच्या तरुण पिढीला वाटते की, लग्न ही एक वाईट गोष्ट आहे. जी कोणत्याही जबाबदाऱ्यांशिवाय मुक्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी टाळता येऊ शकतो. ते ‘वाइफ’ या जुन्या संकल्पनेच्या जागी ‘वरी इनव्हाइटेड फॉर एव्हर’ असा अर्थ काढतील असंही निरीक्षण केरळ न्यायालयाने नोंदवले आहे.

घटस्फोटाच्या वाढत्या संख्येमुळे सामाजिक जीवनावर विपरित परिणाम होईल. केरळ हे एकेकाळी कौटुंबिक संबंधांसाठी प्रसिद्ध होते असेही ते पुढे म्हणालेत. पुरुषांना असे वाटते की स्त्रिया या जीवनात संकटे आणतात असे न्यायालयाने पुढे सांगितले. घटस्फोटासाठी पतीने याचिका दाखल केली असता कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली. पतीने पत्नीच्या छळाचा दाखला देत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वापरा आणि फेकून द्या संस्कृतीचा परिणाम आपल्या वैवाहिक संबंधांवरही झाला आहे. लिव्ह-इन-रिलेशनशिपची प्रकरणे वाढत आहेत आणि जोडपी मोठ्या प्रमाणात विभक्त होत आहेत, असंही न्यायालयाने पुढे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या