33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय विवाहित असूनही लिव्ह इनमध्ये राहणे हा एक प्रकारे गुन्हाच

विवाहित असूनही लिव्ह इनमध्ये राहणे हा एक प्रकारे गुन्हाच

एकमत ऑनलाईन

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपवर एक महत्वाचा निर्णय दिला आहे. विवाहित असूनही अन्य पुरुषासोबत पती-पत्नीप्रमाणे राहणे लिव्ह इन रिलेशन नव्हे, तर तो एक प्रकारचा गुन्हाच असल्याचे म्हणत अशा संबंधांना संरक्षण देण्याचा अर्थ गुन्ह्याला संरक्षण देणे,असा होतो,असे म्हटले आहे. एखाद्या विवाहित महिलेसोबत जो पुरुष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात आहे, तो भारतीय दंड विधानाच्या ४९४ (पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे) आणि ४९५ (अगोदर केलेला विवाह लपवून दुसरा विवाह करणे) च्या अंतर्गत दोषी असेल. अशाच प्रकारे धर्म परिवर्तन करून विवाहितेसोबत राहणे सुद्धा गुन्हा आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले की, कायदेशीर अधिकारांना लागू करणे किंवा संरक्षण देण्यासाठी आदेश जारी केला जाऊ शकतो. कोणत्याही गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी नाही. जर गुन्हेगाराला संरक्षण देण्याचा आदेश दिला गेला तर हे गुन्ह्याला संरक्षण देण्यासारखे आहे. कायद्याच्या विरोधात न्यायालय आपल्या मूळ शक्तींचा वापर करू शकत नाही. न्यायमूर्ती एस. पी. केशरवानी तसेच न्यायमूर्ती डॉ. वाय. के. श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने हाथरस, सासनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला आणि तिच्यासोबत राहात असलेल्या व्यक्तीची याचिका फेटाळत हा आदेश दिला आहे.

रमेशचंद्र (नावे बदलले) यांची याची लतादेवी (नाव बदलले) ही विवाहित पत्नी आहे. दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही. पण, आपल्या पतीपासून विभक्त होऊन गजेंद्रसोबत पत्नीप्रमाणे राहात आहे. याप्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ही लिव्ह इन रिलेशनशिप नाही, गैरवर्तनाचा गुन्हा आहे, ज्यासाठी पुरुष गुन्हेगार आहे. याचिकाकर्त्यांनी ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. त्यांच्या कुटुंबियांपासून संरक्षण दिले जावे,अशी याचिका केली होती.मात्र न्यायालयाने ती फेटाळली.

जे कायदेशीर प्रकारे विवाह करू शकत नाहीत त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे, एकापेक्षा जास्त पती किंवा पत्नींंसोबत संबंध ठेवणे सुद्धा गुन्हा आहे. अशा लिव्ह इन रिलेशनशिपला वैवाहिक जीवन मानले जाऊ शकत नाही आणि अशा लोकांना न्यायालयाकडून संरक्षण दिले जाऊ शकत नाही.

नद्यांमधून होतोय समुद्रात प्लास्टिकचा कचरा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या