27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयलॉकडाऊनची झळ : २ कोटी १० लाख जणांनी गमावला रोजगार

लॉकडाऊनची झळ : २ कोटी १० लाख जणांनी गमावला रोजगार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून देशातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या खासगी डेटा अ‍ॅनलिसिस कंपनीच्या कन्झुमर पिरॅमिडस् हाऊसहोल्ड सर्व्हेमध्ये मे ते ऑगस्ट या ४ महिन्यांत भारतातील पांढरपेशी क्षेत्रातील (व्हाइट कॉलर प्रोफेशनल्स) ६६ लाख कर्मचा-यांनी नोक-या गमावल्याची माहिती समोर आली आहे. एकूण पगारी कर्मचा-यांचा विचार केल्यास एप्रिल ते ऑगस्टदरम्यान देशात २ कोटी १० लाख जणांनी रोजगार गमावला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

सॉफ्टवेअर इंजिनियर्स, शिक्षक, अकाऊंटंट आणि अ‍ॅनालिस्ट्स म्हणून काम करणा-या व्हाइट कॉलर प्रोफेशनल्सला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. पगारी कर्मचा-यांमध्ये या चार क्षेत्रांत सर्वाधिक नोकरकपात झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मागील वर्षी २०१९ साली मे ते ऑगस्ट महिन्यात भारतात याच क्षेत्रात १ कोटी ८८ लाख नोक-या होत्या. या वर्षी जानेवारी ते एप्रिलदरम्यान हा आकडा १ कोटी ८१ लाख इतका होता. यामध्ये लॉकडाउनच्या कालावधीत अभूतपूर्व घसरण झाली.

मागील वर्षी सर्वाधिक नोकरदार वर्ग असणा-या या चार क्षेत्रांना लॉकडाउनचा सर्वांत मोठा फटका बसला आहे. नुकत्याच केलेल्या या सर्वेक्षणात सध्या व्हाइट कॉलर प्रोफेशनल्स म्हणून ओखळल्या जाणा-या क्षेत्रात भारतात १ कोटी २२ लाख जण नोक-या करत आहेत. हा आकडा मे ते ऑगस्टदरम्यानचा आहे. म्हणजेच एप्रिलच्या तुलनेत पुढील ४ महिन्यांत ६६ लाख कर्मचा-यांची कपात झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. २०१६ नंतर व्हाइट कॉलर प्रोफेशनल्सच्या संख्येत झालेली ही देशातील सर्वात मोठी घट आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत कारखान्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना अनेक गोंष्टींसंदर्भातील त्रास सहन करावा लागल्याचेही अहवालात म्हटले आहे. व्हाइट कॉलर प्रोफेशनल्स खालोखाल कारखान्यांमध्ये काम करणा-या नोकरदारवर्गाला अधिक फटका बसल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. कारखान्यांमध्ये काम करणा-या कामगारांनाही मोठा फटका बसला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सांगायचे झाल्यास या वर्षी ५० लाख जणांनी नोकरी गमावली आहे. म्हणजेच वर्षभराच्या कालावधीत एकूण कर्मचारी संख्येच्या २६ टक्के नोक-या गेल्या आहेत, असे सीएमआयईचा अहवाल सांगतो. केवळ पगारी कर्मचा-यांचा विचार केल्यास एप्रिल ते ऑगस्टदरम्यान देशात २ कोटी १० लाख जणांनी रोजगार गमावला असून, यात स्वत:चा व्यवसाय असणा-यांचा समावेश नाही. कारण देशात उद्योग आणि व्यवसायही मोठ्या प्रमाणात मोडित निघाले आहेत.

लघु उद्योग क्षेत्राला मोठा फटका
लघु उद्योगांसंदर्भातील नोक-यांना सर्वात जास्त फटका बसला आहे. याचबरोबर मध्यम व अल्प उद्योगांनाही कोरोना लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. कारण मार्चअखेरपासून ऑगस्ट अखेरपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याने बरेच व्यवसाय मोडित निघाले. लघुउद्योगही ठप्प राहिले. त्यामुळे मोठ्या संख्येने कामगार, कर्मचा-यांना नोक-या गमवाव्या लागल्या.

नोकरवर्गाच्या संख्येत सर्वांत मोठी कपात
जानेवारी ते एप्रिल २०१६ या कालावधीतही देशात सध्यापेक्षा अधिक लोकांना नोक-या होत्या. या कालावधीत देशातील १ कोटी २५ लाख तरुण या क्षेत्रात काम करत होते. मागील ४ वर्षांमध्ये नोकरदार वर्गाची वाढलेली संख्या कोरोना कालावधीत झपाट्याने कमी झाली आहे, असेही या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. पगारी नोकरदारवर्गाच्या संख्येत एका वर्षाच्या कालावधीत झालेली ही सर्वात मोठी कपात आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.

लातूर जिल्ह्यात मृतांचा आकडा ४०० पार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या