25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय बिहारमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

बिहारमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

एकमत ऑनलाईन

पटणा (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नेत्यांची फोडाफोडी सुरू असताना दुसरीकडे कोरोना परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. राज्यातील एकूण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ६ सप्टेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. जदयू आणि राजदने एकमेकांना धक्के देणं सुरू केलं आहे. तर दुसरीकडे बिहारमधील कोरोना परिस्थितीत अजूनही फारशी सुधारणा झाल्याचं दिसत नाही. बिहारमधील कोरोनाची रुग्णसंख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. बिहारमध्ये ४६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७२ हजार रुग्ण बरे झाले असून, ३१ रुग्ण सध्या उपचार घेत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने राज्यातील लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाणार आहे.

पुण्यातील पाच प्रभागांतील ५१ टक्के लोकांमध्ये या अ‍ॅँटिबॉडी आढळल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या