34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयराज्यात लॉकडाऊन लावा

राज्यात लॉकडाऊन लावा

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरातमधील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढ होत आहे. मात्र तरीही राज्यसरकारकडून काहीही प्रतिबंधात्मक आदेश काढलेले नाहीत. त्याबाबत गुजरात उच्च न्यायालयाने खंत व्यक्त केली असून राज्यात लॉकडाऊन, विकेन्ड कर्फ्यू किंवा तत्सम उपायांची गरज असल्याची कानउपटणी केली आहे.

गुजरात उच्च न्यायालयासमोर वाढत्या कोरोना संकटासंबंधी एक याचिका दाखल झाली होती. त्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ढिम्म राज्य सरकारला चपराक लावली. राज्यात तीन – चार दिवसांचा किंवा विकेन्ड कर्फ्यू लावण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले असून त्याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

गुजरातमध्ये कोरोना व्यवस्थापनाची ऐशी-तैशी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये कोरोना व्यवस्थापनातील गलथान कारभार उघडकीस आला आहे. सुरतमधील एका रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यासाठी चक्क कचरा वाहून न्यायावयाच्या गाडीचा वापर झाल्याची बाब समोर आली आहे.

जिल्हाधिका-यांकडून चौकशीचे आदेश
वलसाडचे जिल्हाधिकारी आर.आर.रावल यांनी सूरत महापालिकेने पाठवलेल्या वाहनातून व्हेंटिलेटरची वाहतूक झाल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

१८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची परवानगी द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या