23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयसीबीआयच्या नावे लूट

सीबीआयच्या नावे लूट

एकमत ऑनलाईन

जमशेदपूर : जमशेदपूरमधील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट सीबीआय अधिकारी म्हणून ४ जणांनी छापा टाकून २५ लाख रुपये लुटले. ही घटना मानगो परिसरातील आहे.

रात्री ११ च्या सुमारास सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून एका चोरट्याने बँकेत प्रवेश केला आणि आम्ही छापा टाकत आहोत, असे म्हटले. यानंतर त्याचे आणखी ३ साथीदार बँकेत घुसले. धाडीच्या नावाखाली २५ लाखांचा ऐवज लुटून ते फरार झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या