कोच्ची : केरळमध्ये एक व्यक्ती सकाळी सकाळी भाजीपाला खरेदी करायला गेला पण भाजी खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. फक्त ५०० रुपयांचे सुट्टे करण्यासाठी एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि चक्क त्याला कोटींची लॉटरी लागली.
तिकीट खरेदी केल्यानंतर काही तासातंच त्याला जॅकपॉट लागल्याचे कळले. ७७ वर्षीय व्यक्तीचे नाव सदानंद असून यापुर्वीही त्याने अनेकदा तिकीट खरेदी केले पण त्याला एकदाही लॉटरी लागली नाही. इनकम टॅक्स कापल्यानंतर सदानंदला जवळपास ७ करोड़ रुपये मिळणार आहेत.