25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयगणेशाच्या आशीर्वादानेच लव्ह जिहादचा अंत होईल

गणेशाच्या आशीर्वादानेच लव्ह जिहादचा अंत होईल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीसह देशात अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमप्रकरणांतून अल्पववयीन मुलींवर होणारे प्राणघातक हल्ले वाढले असून गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच या लव्ह जिहादपासून देशाला मुक्ती मिळावी असे साकडे विश्व हिंदू परिषदेने घातले आहे. विहिंपच्या वतीने दिल्ली व परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नेहरू नगर येथील सनातन वेद गुरुकुल येथे यानिमित्त भव्य गणेशमूर्तीसह १०८ लहान मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली होती, यानिमित्त रोज पहाटे मंत्रघोषात पूजा करण्यात आणि सायंकाळी भजन संध्या आयोजित करण्यात आली. यानिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेतही हजारो भाविक सहभागी झाले होते. झारखंडमध्ये अलीकडेच एका तरूणाने विद्यार्थिनीला पेट्रोल टाकून जाळले. त्यापाठोपाठ दिल्लीतही एका विद्यार्थिनीवर गोळीबार झाला. संगम विहारच्या वीर सिंग की कोठी भागात अली नावाच्या किशोरवयीन मुलाने नयना मिश्रा या ११ वीच्या विद्यार्थिनीवर भरदिवसा गोळीबार केला. ही विद्यार्थिनी सुदैवाने बचावली मात्र तिच्या खांद्यात गोळी रुतून बसली आहे. दिल्ली पोलिसांनी अलीसह तिन्ही आरोपींना पकडले आहे.

विहिंपच्या बैठकीत, हिंदू समाजाने एकजुटीने अशा राक्षसी शक्तींचा नायनाट करण्याची वेळ आल्याचे विहिंपच नेते नंदकिशोर, सुरेंद्र जै, कपील खन्ना आदींनी केले. लव्ह जिहादच्या घटना देशात पुन्हा वाढू लागल्या आहेत. संघटित शक्तीनेच या घटनांचा मुकाबला करण्यात येईल. गणेशाच्या आशीर्वादाने या वृत्तींचा नाश होईल त्यासाठी बाप्पाने हिंदू बांधवांना शक्ती व आशीर्वाद द्यावा असे मागणे विहिंपच्या वतीने गणेशाजवळ करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या