24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीय१० पैकी ३ जणांवर लसीचा कमी प्रभाव

१० पैकी ३ जणांवर लसीचा कमी प्रभाव

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : कोरोनाविरोधातील लढाईत कोरोना लस हेच प्रभावी अस्त्र मानले जात आहे. अशावेळी कोरोना लस घेतल्यानंतर तुमच्या शरीरात निर्माण झालेली इम्यूनिटी किती दिवस टिकते? असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर भारतीय तज्ज्ञांनी शोधल असून केलेल्या णका सर्वेक्षणात १० पैकी ३ लोकांमध्ये कोरोना लसीमुळे तयार झालेल्या इम्यूनिटीचा परिणाम ६ महिन्यानंतर संपतो, असा खुलासा समोर आला आहे.

हैदराबादेतील एडीए रुग्णालय आणि एशियन हेल्थकेअर यांनी मिळून कोरोना लसीच्या इम्यूनिटीबाबत एक अभ्यास केला होता. यात १ हजार ६३६ लोकांचा सहभाग होता. या सर्वांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. एडीए रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी अभ्यासाचा उद्देश हा लसीनंतर शरीरात निर्माण झालेल्या इम्यूनिटीचा परिणाम तपासणे हा होता. तसेच किती जणांना बुस्टर डोसची गरज लागू शकते, याचा अंदाजही या अभ्यासातून घेतला जाणार आहे, असे सांगितले.

अभ्यासाअंतर्गत लोकांच्यातील कोरोना विरोधातील अ‍ॅन्टीबॉडी तपासण्यात आल्या. त्यानुसार ज्या लोकांमध्ये एन्टीबॉडीचा स्तर १५ एयु प्रति मिली आहे, त्यांची इम्यूनिटी संपली आहे. तर ज्या लोकांमध्ये अ‍ॅन्टीबॉडीचा स्तर १०० एयु प्रति मिली आहे, त्यांच्यात इम्यूनिटी अद्यापही असल्याचे या अभ्यासातून दिसून आले. शरीरातील अ‍ॅन्टीबॉडीचा १०० एयु प्रति मिली असायला हवा. हा स्तर एखाद्या व्यक्तीमध्ये कमी असेल तर तो कोरोना संक्रमित होण्याची शक्यता असते, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

१) अभ्यासात तपासलेले निकष
अभ्यासात सहभागी १ हजार ६३६ लोकांपैकी ९३ टक्के लोकांनी कोविशिल्ड, ६.२ टक्के लोकांनी कोव्हॅक्सिन तर १ टक्के लोकांनी स्फुटनिक-व्ही लसीचे डोस घेतले होते. जवळपास ३० टक्के लोकांमधील इम्यूनिटीचा स्तर १०० एयु प्रति मिली पेक्षाही कमी झाल्याचे पाहायला मिळाले. हायपरटेन्शन आणि मधुमेह यासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या ४० वर्षांवरील नागरिकांमधील इम्यूनिटी कमी झाली आहे. तसेच ६ टक्के लोकांमध्ये इम्यूनिटी शिल्लकच नसल्याचे ते म्हणाले. अभ्यासानुसार वृद्धांपेक्षा युवकांमध्ये बराच कालावधीपर्यंत इम्यूनिटी टिकून राहते. तर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या ४० वर्षावरील नागरिकांमध्ये अ‍ॅन्टीबॉडी ६ महिन्यानंतर कमी होतात, असे दिसून आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या