26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशद्रोहाचे सर्वात कमी गुन्हे जम्मू काश्मिरात

देशद्रोहाचे सर्वात कमी गुन्हे जम्मू काश्मिरात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरातल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यांची आकडेवारी आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आली आहे. देशभरात २०२१ या वर्षात देशद्रोहाचे ४७५ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यापैकी सर्वाधिक गुन्हे आसाममध्ये नोंदवले गेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

आसाममध्ये २०१४ ते २०२१ या कालावधीत देशातल्या ४७५ गुन्ह्यांपैकी ६९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आसाममध्ये गेल्या ८ वर्षांतल्या गुन्ह्यांची संख्या १४.५२ टक्के आहे. म्हणजेच गेल्या आठ वर्षांमध्ये देशात दाखल झालेला ६ पैकी एक गुन्हा आसाममध्ये दाखल झाला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या आकडेवारीवरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. २०१४ पासून देशद्रोहाच्या कलम १२४ ए अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संग्रहित माहितीच्या आधारे हे निष्कर्ष समोर आले आहेत.

२०२१ मध्ये देशात सर्वांधिक गुन्ह्यांची नोंद
२०२१ साली देशभरात देशद्रोहाचे ७६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०२० मध्ये ७३ गुन्हे दाखल झाले होते. तर त्याहीपेक्षा २०१९ मध्ये जास्त म्हणजे ९३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर सर्वात कमी म्हणजे ३० गुन्हे २०१५ मध्ये नोंदवण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या