21.2 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home राष्ट्रीय १ नोव्हेंबरपासून ओटीपी शिवाय मिळणार नाही एलपीजी सिलेंडर

१ नोव्हेंबरपासून ओटीपी शिवाय मिळणार नाही एलपीजी सिलेंडर

एकमत ऑनलाईन

मुंबई: घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसांनंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करतात अशी सध्याची पद्धत आहे. मात्र यात १ नोव्हेंबरपासून महत्वाचा बदल होणार आहे. आता सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असेल. ओटीपीशिवाय सिलेंडरची होम डिलेव्हरी होणार नाही. सिलेंडर ऑनलाईन बुक करताना ग्राहकांना पैसे भरावे लागतील. यानंतर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

यासोबतच १ नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होईल. केंद्र सरकारच्या धोरणांनुसार पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतात. त्यानंतर नवे दर महिन्याभरासाठी लागू होतात. यंदा सिलेंडरच्या दरात अधिक बदल होणार नाही, अशी शक्यता आहे. मात्र अधिकची सबसिडी खात्यात येणार का, हा प्रश्न आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती अतिशय कमी झाल्या आहेत. त्यामुळे सबसिडी देण्याची गरज उरलेली नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास यांना कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या