26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयराजस्थानमध्ये लम्पीचे थैमान

राजस्थानमध्ये लम्पीचे थैमान

एकमत ऑनलाईन

जयपूर : सध्या देशात दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे. यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर जनवारांना लम्पी स्कीन आजार झाला आहे. यामुळे तेथील दूध उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. दुधाच्या उत्पादनात दोन लाख लीटरची घट झाली आहे. दुधाचे उत्पादन घटल्याने मिठाईच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत.

राजस्थानमधील सर्वात मोठी दूध सहकारी संस्था जयपूर डेअरी फेडरेशनच्या मते, दूध संकलनात १५ ते १८ टक्के घट झाली आहे. मात्र, आजतागायत दूध पुरवठा खंडित झालेला नाही. जयपूर डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष ओम पुनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दैनंदिन दूध संकलन १४ लाख लिटरवरून १२ लाख लिटरवर आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या