25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeराष्ट्रीयरेल्वेमध्ये ‘मेड इन इंडिया’चे नवे इंजिन; १२००० अश्वशक्­तीच्या वॅग १२ बीचा...

रेल्वेमध्ये ‘मेड इन इंडिया’चे नवे इंजिन; १२००० अश्वशक्­तीच्या वॅग १२ बीचा समावेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात १०० वॅग १२००० एचपी डब्ल्यूएजी १२ बी रेल्वे इंजिन समाविष्ट करण्यात आले असून, ही देशातील सर्वात शक्तिशाली मेड-इन-इंडिया इलेक्­ट्रिक इंजिन्स आहेत. या इंजिनाचे नाव डब्ल्यूएजी १२ बी असे आहे जे ६०१०० क्रमांकाचे आहे.

हे इंजिन मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे. ही रेल्वे इंजिन्स आयजीबीटी शैलीवर आधारित ३ फेज ड्राइव्ह आणि १२००० अश्­वशक्­ती इलेक्­िट्रक इंजिन दर्जाची आहेत. ही उच्च अश्­वशक्­ती असलेली इंजिन्स सरासरी वेग आणि मालवाहतूक करणाºया गाड्यांची भार क्षमता सुधारून गर्दी असलेल्या रेल्वेमार्गावरील ताण हलका करण्यास मदत करतील.

मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली ही उत्कृष्ट इलेक्­िट्रक रेल्वे इंजिन्स देशातील मालवाहतूक चळवळीत क्रांती घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. जलद, अधिक सुरक्षित आणि जड मालवाहतुकीच्या गाड्यांना देशभर जाण्याची परवानगी देताना भार क्षमता सुधारल्याने गर्दी असलेल्या रेल्वेमार्गावरील ताण हलका होण्यास मदत होईल. आतापर्यंत, ही ई-इंजिन्स रेल्वेच्या सर्व विभागात आहेत आणि चांगली कामगिरी करत आहेत.

ड्रीम्स मॉलमधील आग निष्काळजीपणामुळेच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या