24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशात सरकारी कर्मचा-यांना तिरंगा खरेदी करण्याचे आदेश

मध्य प्रदेशात सरकारी कर्मचा-यांना तिरंगा खरेदी करण्याचे आदेश

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजप कार्यांलयात तिरंगा विकला जात आहे आणि राज्यात सगळ्या सरकारी अधिका-यांना सक्ती केली आहे की सगळ्यांनी तिरंगा स्वखर्चाने विकत घेऊन तो घरावर लावायचा आणि त्यांचा फोटो हर घर तिरंगा या वेबसाईट वर अपलोड करायचा आहे. भाजप कार्यालयात विकला जाणारा तिरंगा त्याची किंमत २० रूपये आणि त्याच्या दांडीची किमत १० रूपये ठेवण्यात आली आहे. यावर पक्षाचे म्हणने आहे की कोणतेही घर तिरंग्या विना राहता कामा नये. म्हणून आम्ही कमी किमती मध्ये तिरंगा उपब्लध करण्यात आला आहे.

झेंडा खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले की आम्ही झेंडा कॉलनीतील मंदिरावर, टाकीवर आणि जागा मिळेल तिथे लावणार आहे. त्यानंतर कॉलनीतही त्याचे वाटप कले. त्याचवेळी झेंडे पाठविणा-या नीरव प्रधानने सांगितले की, आम्ही पहिल्या दिवशी १००० रुपये किमतीचे झेंडे आणले होते. ते विकले आणि नंतर घडलेल्या पैशातून आणखी झेंडे खरेदी केले. जे विक्री केली जाते त्याची नोंद केला जात आहे.

हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत राज्यातील सरकारी अधिका-यांनी तिरंगा खरेदी करून तो स्वताच्या घरी लावायचाच आणि धार जिल्हातील सर्व शिक्षकांनी ३०० रूपये खर्च करून कमीत कमी १० झेंडयांचे वाटप कारण्याचे आदेश अतिरिक्त विभागाने काढले आहेत. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक लाल सिंह म्हणाले की, प्रत्येक शिक्षकाला १० झेंडे खरेदी करायचे आहेत. एक झेंडा घरावर लावायचा आणि उरलेला गोरगरिबांना वाटायचा.

काँग्रेस-भाजप आमनेसामने
या मुद्यावरून सध्या काँग्रेस-भाजप आमनेसामने आहेत. एकीकडे भाजप काँग्रेसला विकृत मानसिकतेचे सांगत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला झेंडा विकणे लाजिरवाणे वाटत आहे. मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्हीडी शर्मा म्हणाले की, प्रत्येक घराने तिरंगा फडकावा हीच आमची भावना आहे. आम्ही राजकारण करत नाही. आम्ही फक्त तिरंगा वाटत आहे. आम्ही तिरंगा विकत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या