23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय  कर कपातीवर महाराष्ट्रा पाठोपाठ तामिळनाडू सरकारचा केंद्राला सवाल

  कर कपातीवर महाराष्ट्रा पाठोपाठ तामिळनाडू सरकारचा केंद्राला सवाल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी कर कमी करण्याचा निर्णय काल घेतला. पेट्रोलवरील अबकारी कर ८ रुपयांनी तर डिझेलवरील कर ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोल ९ रुपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

केंद्राच्या वतीने हा निर्णय जाहीर करताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बिगरभाजपशासित राज्यांना विशेष आवाहन केले होते. या राज्यांनी आता त्यांच्या पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी, असे त्या म्हणाल्या. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने केंद्रीय अबकारी कर प्रथम जेवढे होते, त्या पातळीवर नेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रा पाठोपाठ तामिळनाडूने केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे.

तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पी. थियाग राजन यांनी शनिवारी रात्री उशिरा निर्मला सीतारामन यांच्या ट्विटला रीट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. पी. थियाग राजन म्हणाले, केंद्र सरकारने कर वाढवताना राज्यांना विचारले नव्हते. २०१४ मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर जे कर होते त्यामध्ये वाढ केली आहे. पेट्रोलवरील कर २५० टक्के आणि डिझेलवरील कर ९०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवला होता. तुम्ही लादलेल्या वाढीव करापैकी ५० टक्के कर कपात करता आणि राज्य सरकारांना कर कपात करण्याचे आवाहन करता हे कोणता संघराज्यवाद आहे, असे पी. थियाग राजन म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा-सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या