30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयदेशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाला आलेली संथ गती यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात कुलगीतुरा बघायला मिळाला. केंद्राकडून लस वितरणात राजकारण होत असल्याचा आरोप राज्यातून केला गेला. तर दुसरीकडे केंद्राकडून राज्याचे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. लस वाटपावरून पेटलेल्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भूमिका मांडली़

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एका कार्यक्रमात बोलताना लस तुटवडा आणि पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. लस तुटवडयावर बोलताना हर्ष वर्धन म्हणाले, अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे सांगितले जात आहे, पण केंद्र सरकार थेट लसीकरण केंद्रापर्यंत लस पुरवठा करत नाही. केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणे हे राज्य सरकारचे काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेले नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचे अपयश आहे. लस वितरणात कोणतेही राजकारण केले जात नाही आहे, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

लस पाठवूनही दोन महिने लसीकरण केले नाही
राज्यांना दिल्या जाणा-या लसींच्या वितरणावर बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, कोव्हॅक्सिनवरून महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये राजकारण केले जात आहे. छत्तीसगढमध्ये आम्ही जानेवारीमध्ये कोव्हॅक्सिन लसीचे डोस पाठवले होते. दोन महिन्यांपर्यंत त्यांनी लसीकरणच सुरू केले नाही. मी आरोग्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले. कोव्हॅक्सिन लस लोकांना देणार नाही म्हणत तीन महिन्यांपर्यंत फक्त राजकारण करत राहिले. आता मार्च अखेरीपासून लसीकरण सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.

तीन राज्यांत सर्वाधिक लस पुरवठा
महाराष्ट्राला लस पुरवठा कमी केला जात असल्याच्या आरोपावर बोलताना हर्ष वर्धन म्हणाले, आज जरी बघितले, तर सर्वाधिक लसीचे डोस कुणाला दिले असेल, ते महाराष्ट्राला दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांना १ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. लस वितरणात लोकसंख्येचा निकष नाही. लोकसंख्येचा विचार करायला गेले, तर मग सर्वाधिक लस उत्तर प्रदेशला मिळायला हवी होती. पण, तसे झाले नाही, अशी भूमिका केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मांडली.

किंचित दिलासा, राज्यात ५५ हजार नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या