22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्र उत्तम लढाई लढतोय; पंतप्रधान मोदींकडून ठाकरे सरकारची स्तुती

महाराष्ट्र उत्तम लढाई लढतोय; पंतप्रधान मोदींकडून ठाकरे सरकारची स्तुती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना लढ्यात महाराष्ट्र उत्तम लढाई लढत असल्याची स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार दि़ ८ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे़ दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लसीकरणासंदर्भात दोन मागण्यांचा विचार व्हावा अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजे शनिवार ८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद झाला.

यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. तसेच, कोरोनाच्या दुस-या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत मोदींनी राज्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली आणि महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली आहे. तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन सुरू आहे, त्याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, असं सांगून महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

मु्ख्यमंत्र्यांचे आवाहन
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्रही प्रसिद्ध झाले आहे. त्यात उद्धव यांनी महाराष्ट्रात विशेषत: १८-४४ या वयोगटात आणखी वेगाने लसीकरण करता यावं, यासाठी काही सूचना केल्या आहेत. लसीची मागणी वाढल्यामुळे नोंदणीसाठी लस उपलब्ध होताच कोविन वेबसाईट काम करेनाशी होते. त्यामुळे प्रत्येक राज्याचे स्वतंत्र कोविन अ‍ॅप तयार केले जावे आणि त्यातली माहिती केंद्रासोबत शेअर केली जावी अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.

इतर लस निर्मात्यांकडून लस घेण्याची परवानगी द्या!
लसींचा पुरवठा वाढावा यासाठी सर्व लसी एकाच वेळेत विकत घेण्याची महाराष्ट्राची तयारी आहे, मात्र लसीच्या निर्मात्यांकडे तेवढ्या लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे राज्यांना इतर लस निर्मात्यांकडून लसी घेण्याची परवानगी मिळाली, तर अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर लस देणे शक्य होईल. त्यासाठी प्रत्येक राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाची मदत घेता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

राज्यात टप्प्याटप्प्याने लसीकरण?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या