25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्राला भरघोस निधी मिळणार

महाराष्ट्राला भरघोस निधी मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यÞक्षतेखाली दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राला मिळणा-या निधीबाबत चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले. त्यांनी या बैठकीत काय झाले. याबद्दल माध्यमांना माहिती दिली. महाराष्ट्राला केंद्राकडून भरघोस निधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. याच बैठकीतल्या एका फोटोमुळे ही बैठक चर्चेत आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्री फोटोसाठी उभे होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना अगदी कोप-यात मागच्या ओळीत उभे केल्याने विविध नेत्यांकडून टीकाटिप्पण्या केल्या जात होत्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या