33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeराष्ट्रीयनव्या संसद भवनासमोर आता महिला महापंचायत

नव्या संसद भवनासमोर आता महिला महापंचायत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणा-या पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी आता आपल्या आंदोलनाचा मोर्चा नव्या संसद भवनाच्या दिशेने वळवला आहे.

आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी आज पत्रकारांना आपण न्याय मिळावा, यासाठी काय करणार याची माहिती दिली. विनेश म्हणाली, आमच्या सर्व खाप पंचायतींनी आणि मोठ्यांनी एक निर्णय घेतला आहे. २८ तारखेला नव्या संसद भवनाच्या समोर महिलांची महापंचायत भरवण्याचा निर्णय घेतला आहे. या शांतीपूर्ण आंदोलनात युवा आणि सर्व इतर समर्थक मागे पाठिंबा देण्यासाठी उभे असतील. ते आमची ताकद बनण्याचा प्रयत्न करतील, असे म्हटले.

ही महिलांची महापंचायत आहे. त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व महिला करणार आहे. आमच्या जेवढ्या मोठ्या माता आणि भगिनी आहेत. ज्या आम्हाला समर्थन देण्यासाठी आल्या आहेत. त्या सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन करते. हा आवाज उठला आहे तर तो दूरपर्यंत जायला हवा. आज जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही येणा-या पिढीला हिंमत देण्याचे काम करू, असे विनेश म्हणाली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या