26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home राष्ट्रीय विवाहबा संबंध कायदा सशस्त्र दलात कायम ठेवा

विवाहबा संबंध कायदा सशस्त्र दलात कायम ठेवा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : विवाहबा संबंध ठेवल्याबद्दल गुन्ह्यांची नोंद व्हावी यासाठी विवाहबा संबंधाचा कायदा सशस्त्र दलात कायम राहावा यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विवाहबा संबंधाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय सशस्त्र दलाला लागू करण्यात येऊ नये, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हे प्रकरण आता सरन्यायाधीस शरद बोबडे यांच्याकडे गेले आहे. या प्रकरणाची सुनावणी पाच सदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

सशस्त्र दलातील कर्मचा-याला सहका-याच्या पत्नीसोबत विवाहबा संबंध ठेवले तर सैन्याच्या सेवेतून काढून टाकले जाते़ त्यामुळे विवाहबा संबंधाचा कायदा रद्द करण्याचा नियम सशस्त्र दलाला लागू करण्यात येऊ नये, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.

नेमका काय होता कायदा?
भारतीय दंडविधान कलम ४९७ अंतर्गत विवाहबा संबंध हा गुन्हा मानले जात होते. पण २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवाहबा संबंधाचा कायदा रद्द केला होता. अशाप्रकारचे संबंध गुन्ह्याच्या चौकटीत बसवता येणार नाहीत, असे मत त्यावेळी न्यायालयाने व्यक्त केले होते़ पण हे संबंध घटस्फोटाचा आधार घेऊ शकतात, असेही न्यायालयाने नमूद केले होते़

कायद्यात ५ वर्षांपर्यंतची शिक्षा
विवाहबा संबंधाच्या कायद्यात पुरुषांना ५ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरदूत होती. एखाद्या विवाहितेशी तिच्या सहमतीने किंवा सहमतीशिवाय संबंध ठेवल्याप्रकरणी शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये होती.

टेस्लाचे देशात आगमन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या