22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयलसीकरण नोंदणीच्या कोविन अ‍ॅपमध्ये मोठा बदल

लसीकरण नोंदणीच्या कोविन अ‍ॅपमध्ये मोठा बदल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सरसकट १८ वर्षांवरील लोकांना कोरोना लस देणे सुरू झाले आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. कोविन पोर्टलमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारीनंतर आता या अ‍ॅपमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. वास्तविक ज्या लोकांनी लसीकरणासाठी अपाईंटमेंट घेतली होती, परंतु काही कारणास्तव ते लसीसाठी जाऊ शकले नाहीत, त्यांनाही लस दिल्याचा संदेश येऊ लागला. त्यांच्या तक्रारीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पोर्टलमध्ये बदल केला आहे.

या नवीन बदलाअंतर्गत लस नोंदणीनंतर जर तुम्ही अपॉईंटमेंट बुक कराल तर आपल्या मोबाइल नंबरवर ४ अंकी ओटीपी येईल. आपल्याला लसीकरण केंद्रात हा ओटीपी दर्शविण्याची आवश्यकता असेल. हे आपण अपॉइंटमेंट बुक केली होती याची पडताळणी करेल. यासह, लसीकरणाच्या डेटामध्ये कोणतीही गडबड होणार नाही. खरे तर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे तक्रारी येत होत्या की ज्यांनी लसीकरणासाठी अपॉईंटमेंट बुक केली आहे, पण लसीसाठी जाऊ शकत नाही अशा लोकांनाही लसी देण्याबाबत संदेश मिळाला. त्यांना लसीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आरोग्य कर्मचा-यांकडून चुकून कोविन पोर्टलवर अशा लोकांना लस दिल्याची पुष्टी केली गेली़

पोर्टलचा डॅशबोर्ड बदलला
ओटीपी व्यतिरिक्त कोविन पोर्टलचा डॅशबोर्डही बदलला आहे. आता आपण अपॉइंटमेंटसाठी पिनकोड किंवा जिल्ह्यासाठी प्रवेश कराल, त्यानंतर आपल्यासमोर आपल्यासमोर ६ नवीन पर्याय उघडतील. या पर्यायांद्वारे आपण वयोगट (१८+किंवा ४५+) कोणत्या प्रकारची लस (कोव्हीशील्ड किंवा कोव्हॅक्सिन), विनामूल्य किंवा सशुल्क लस निवडण्यास सक्षम असाल.

कोणती लस मिळणार याचीही माहिती
हा बदल होण्यापूर्वी, लस मिळाल्यानंतर, संदेश आल्यानंतर हे माहित होत होते की आपल्याला कोणती लस दिली आहे. परंतु या सुविधेद्वारे आपल्याला आधीपासून सर्व माहिती मिळेल. वास्तविक, ब-याच लोकांची अशी मागणी होती की आम्हाला कोणती लस हवी आहे ते निवडण्याचा अधिकार आम्हाला देण्यात यावा. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. आता आपल्याला कोणती लसी कुठे आणि कोणती घ्यायची आहे याबद्दल माहिती मिळेल. तेव्हा त्यानुसार आपण स्वत: साठी स्लॉट बुक करू शकाल.

मोबाईलवर आलेला ओटीपी पडताळणे अनिवार्य
येथे आपल्याला फोटो आयडी प्रूफ, नाव, लिंग आणि जन्म वर्ष एंटर करावे लागेल. लक्षात ठेवा की आपण जी काही माहिती एंटर करत आहात ती फोटो आयडी प्रूफनुसार एंटर करा. लसीकरणावेळी आपल्याला हा आयडी पुरावा आपल्याबरोबर घ्यावा लागेल. आपल्या सोयीनुसार अपॉईंटमेंट बुक करा. अपॉईंटमेंट बुक केल्यावर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज मिळेल. ज्यात ४ अंकी ओटीपी कोड देखील असेल. हा कोड लसीकरणावेळी संबंधित आरोग्य कर्मचा-यास दाखवावा लागेल.

जंबो कोविड सेंटरमध्ये पडद्यावर पाहायला मिळणार योगासन, रामायण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या