26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयसगळ्यांना लस उपलब्ध करून देणे सोपे नाही - सीरमचे अदर पूनावाला

सगळ्यांना लस उपलब्ध करून देणे सोपे नाही – सीरमचे अदर पूनावाला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आपण नक्की किती लस तयार करू शकू आणि किती दिवसांत सगळ्यांना लस मिळेल असा प्रश्­न विचारला जातो आहे. तसेच देशात गरज असताना बाहेर लस का निर्यात केली जात आहे त्यावरूनही गदारोळ माजला आहे. अशा स्थितीत ऑक्­स्फर्ड स्ट्रोजेनकाच्या लसीचे भारतात उत्पादन करणा-या सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

सध्या भारतात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. आत्ता सर्वांसाठी लस उपलब्ध करून देणे वाटते तेवढे सोपे काम असणार नाही, असे अदर पूनावाला यांनी मुलाखतीत म्हटले आहे. आपल्याकडचे लसीचे उत्पादन आणि त्याची उपलब्धता लक्षात घेणे आवश्­यक आहे. सगळ्यांना लस उपलब्ध करून दिली, तर ज्यांना लसीची सगळ्यात जास्त गरज आहे, त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सगळ्यांना लस उपलब्ध करून देणे सोपे नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

आपल्या देशाची लोकसंख्या आणि इतर देशांची लोकसंख्या यांची तुलना होऊ शकत नाही. पण त्याच वेळी सरकारच्या दृष्टीने लसीची आवश्­यकता असलेल्या सर्व गरजू गटांमध्ये योग्य समन्वय साधणे आवश्­यक आहे. त्यामुळे लस सगळ्यांना उपलब्ध करून द्यायला हवी का? या प्रश्­नाचे उत्तर देणे कठीण आहे. कारण या प्रश्नाला आजच्या परिस्थितीमध्ये कोणतेही बरोबर किंवा चुकीचे उत्तर नाही. खुल्या बाजारामध्ये लस उपलब्ध करून द्यायला हवी की नको? माझे वैयक्तिक मत असेल हो. पण सरकार आणि देशातील गरीबांच्या दृष्टीने त्याचे उत्तर नाही असेल, असेही ते म्हणाले.

राजकारणाच्या किड्यावर औषध काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या