21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयमल्लिकार्जुन खर्गे ईडीसमोर हजर

मल्लिकार्जुन खर्गे ईडीसमोर हजर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसची अडचण संपण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी दि. ४ ऑगस्ट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हेराल्ड हाऊसमध्येच ईडीच्या अधिका-यांसमोर हजेरी लावली. ईडीने काँग्रेसच्या मालकीचे वृत्तपत्र नॅशनल हेराल्डची होल्डिंग कंपनी यंग इंडियनच्या (वाईआय) कार्यालयावर पुन्हा छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (८०) हे हेराल्ड भवन, बहादूर शाह जफर मार्गावर आयटीओजवळ पोहोचले आणि ईडी अधिका-यांची भेट घेतली. कंपनीचा महत्त्वाचा अधिकारी असल्याने ईडीने यंग इंडियनच्या कार्यालयावर छापे टाकताना त्यांची उपस्थिती मागितली होती. यंग इंडियनच्या शेअरहोल्डर्समध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही नावे आहेत. काँग्रेस अध्यक्षांची कंपनीत ३८ टक्के हिस्सेदारी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या