18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयमल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार खरगेंनी हा राजीनामा दिला आहे. दरम्यान खरगे यांची अध्यक्षपदासाठी दावेदारी मजबूत मानली जात आहे. त्यांनी काल काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज भरल्यानंतर आज राज्यसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कुणाकडे सोपवणार याची उत्सुकता देखील लागली आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश यांची नावे चर्चेत आहेत. राजीनामा दिल्यानंतर खरगे म्हणाले की, काँग्रेसच्या एका नेत्याच्या एका पदाच्या नियमानुसार आपण हा निर्णय घेतला आहे. खरगे यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्याचिंतन शिबिरात पक्षात कोणत्याही व्यक्तीला दोन पदे भूषवता येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता.

खरगे काँग्रेसचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात
मल्लिकार्जुन खडके हे पक्षाचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. खरगे यांनी ३० सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला, त्यानंतर आता १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. खरगे यांच्या विरोधात काँग्रेस नेते शशी थरूर आहेत. खरगे यांना गांधी घराण्याकडून झुकते माप असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांचा विजय होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यांनी नामनिर्देशन केले तेव्हा त्यांच्यासोबत ३० प्रस्तावक उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या