नवी दिल्ली : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मल्ल्याला दोषी ठरवून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे अवमान प्रकरण ४० दशलक्ष म्हणजेच सुमारे ३१८ कोटी रुपयांशी संबंधित आहे. मल्ल्या याने ही रक्कम आपल्या तीन मुलांना पाठवली होती.
ही रक्कम चार आठवड्यांत व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्या सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला दोन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.