24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयमंत्र्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात

मंत्र्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात

एकमत ऑनलाईन

कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातल्या दोन मंत्र्यांना आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. फिरहाद हकीम आणि सुब्रता मुखर्जी यांना भ्रष्टाचाराच्या अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनीही सीबीआयच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली. या दोघांबरोबरच सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटोपाध्याय यांनाही अटक केली आहे. या चौघांनाही कोलकात्याच्या त्यांच्या घरामधून ताब्यात घेण्यात आले. या चौघांविरोधात दाखल झालेल्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनकर यांनी या चौघांच्या अटकेला मंजुरी दिली.

या चौघांनाही एका स्टिंग ऑपरेशनच्या आधारे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी हे राज्यमंत्री होते. २०१६च्या विधानसभा निवडणुकीच्या बरोबर आधी हे प्रकरण उघड करण्यात आले. मार्च २०१७मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येईल.

अटक राजकीय उद्देशाने : बॅनर्जी
ही बातमी कळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते यांनी सीबीआयच्या कार्यालयाकडे धाव घेतली. तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर निदर्शने करायला सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसने या निदर्शनांच्या माध्यमातून ही अटक राजकीय उद्देशाने झालेली असल्याचा आरोप केला आहे.

महागाई दर १०.४९ टक्क्यांवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या