24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात सध्या काँग्रेस विरुद्ध भाजप अस संघर्षाचे वातावरण आहे. महागाई आणि ईडी कारवाईच्या मुद्यावर काँग्रेसने आज देशव्यापी आंदोलन केले. यामध्ये प्रत्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या देखील रस्त्यावर उतरल्या होत्या. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या सध्या चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यानंतर साधारण अर्धा तास पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये भेट झाली. त्यानंतर त्या आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. पण या भेटीदरम्यान त्यांच्यामध्ये कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याचा तपशील मात्र अद्याप समोर आलेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या