25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयममता बॅनर्जी यांचा उद्या शपथविधी

ममता बॅनर्जी यांचा उद्या शपथविधी

एकमत ऑनलाईन

कोलकाता : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अक्षरश: धुव्वा उडवला. त्यामुळे भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी तिस-यांदा मुख्यमंत्रिपदाची ५ मे रोजी शपथ घेणार आहेत. दरम्यान, बॅनर्जी यांनी राज्यपालांची भेट घेऊन आज सरकार स्थापनेचा दावा केला.

तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, ६ मे रोजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पार्थ चटर्जी यांनी दिली. शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही. राज्यपाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्रीदेखील शपथ घेण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि देशातील पोटनिवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. तब्बल ८ टप्प्यांत मतदान पार पाडलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींच्या झंझावाती प्रचाराचे केंद्र ठरलेल्या बंगालच्या निकालाबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र, निकालात तृणमूल काँगे्रसने मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

अकारण सिटीस्कॅन केल्यास कॅन्सरचा धोका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या